Ad will apear here
Next
‘आनंदवनाचा विकास’चे २९ सप्टेंबरला प्रकाशन
पुणे : बाबा आमटे यांनी कुष्ठरुग्णांच्या पुनर्वसनासाठी उभारलेल्या आनंदवनाला पुढे नेण्याचे काम डॉ. विकास बाबा आमटे यांनी केले. त्यांच्यासह आमटेंची तिसरी पिढी आता आनंदवनात कार्यरत आहे. आनंदवनातील त्यांचे कार्य व त्यांनी राबवलेल्या विविध प्रयोगांची कहाणी डॉ. चित्रलेखा पुरंदरे यांनी ‘आनंदवनाचा विकास’ या पुस्तकात मांडली असून, विश्वकर्मा पब्लिकेशनने प्रकाशित केले आहे.

या पुस्तकाचे प्रकाशन पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिवलमध्ये २९ सप्टेंबर २०१८ रोजी सायंकाळी पाच वाजता बाणेर रस्त्यावरील यशदा येथे डॉ. विकास आमटे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात विकास आमटे यांच्यासह पत्नी डॉ. भारती आमटे व कन्या डॉ. शीतल आमटे याही उपस्थित राहणार असून, या वेळी डॉ. मंदार परांजपे या तिघांशीही संवाद साधणार आहेत. याचवेळी डॉ. जयश्री तोडकर आणि संतोष शेणई लिखित ‘ओबेसिटी मंत्रा’ याही पुस्तकाचे प्रकाशन केले जाणार आहे,’ अशी माहिती पब्लिकेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सोनी दिली आहे.

पुस्तक प्रकाशनाविषयी :
दिवस :
शनिवार, २९ सप्टेंबर २०१८
वेळ : सायंकाळी पाच वाजता
स्थळ : यशदा, बाणेर रस्ता, पुणे
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VZJJBS
Similar Posts
‘समाजसेवा व्यक्तिसापेक्ष असता कामा नये’ पुणे : ‘समाजासाठी काम करण्याच्या भावनेतून आज अनेक तरुण पुढे येतात; मात्र बऱ्याचदा प्रसिद्धी आणि स्वार्थ यावर भर दिला जातो. बाबा आमटे यांनी शिकवलेली नि:स्वार्थी समाजसेवा आपण अंगिकारली पाहिजे. समाजातील वंचितांना सन्मानाचे आयुष्य जगण्यासाठी आपली सेवा उपयोगी पडावी. समाजहिताचे विधायक काम उभारायचे असेल, तर
आनंदवनाचा विकास कुष्ठरोग्यांची सेवा करण्याच्या ध्येयाने बाबा आमटे यांनी आनंदवनाची निर्मिती केली आणि समाजातील दुर्लक्षित घटकांच्या जीवनात आनंद फुलविला. त्यांचे पुत्र डॉ. विकास आमटे यांनी बाबांचा वसा पुढे नेला. या विकासपुत्राची कहाणी डॉ. चित्रलेखा पुरंदरे यांनी ‘आनंदवनाचा विकास’मधून कथन केली आहे.
डॉ. राजाभाऊ, रेणू दांडेकरांचा सन्मान पुणे : आंतरराष्ट्रीय पालक दिनाचे औचित्य साधून ‘तुम्ही-आम्ही पालक’ मासिकाच्या वर्धापदिनानिमित्त डीपर व सर फाउंडेशनतर्फे देण्यात येणारा ‘महापालक सन्मान २०१७’ सामाजिक कार्यकर्ते डॉ. राजाभाऊ व रेणू दांडेकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. विकास
दादा कोंडकेंच्या २१व्या स्मृतिदिनानिमित्त गुणवंतांचे सत्कार पुणे : दादा कोंडके मेमोरिअल फाउंडेशनतर्फे दादा कोंडके यांच्या २१व्या स्मृतिदिनानिमित्त एका विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी गोखलेनगर परिसरातील कष्टकरी नागरिकांना अवघ्या दहा रुपयांत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणारे डॉ. शशिकांत चव्हाण आणि एकपात्री कलाकार संतोष चोरडिया यांचा सन्मान करण्यात

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language